आपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनच्या संयोजकपदी उदय धकाते व निलेश सातपुते

गडचिरोली, प्रतिनिधी :-

डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन (GAMA) च्या नव्या कार्यकारिणीत संयोजकपदी उदय धकाते व निलेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने सुमारे पाच वर्षांपूर्वी गडचिरोली येथे गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासूनच संघटनेने पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविला असून विविध सामाजिक, राजकीय व जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले आहे.

पत्रकार परिषदांच्या माध्यमातून तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून संघटनेच्या सदस्य पत्रकारांनी अनेक महत्त्वाच्या समस्या, सामाजिक अन्याय, राजकीय घडामोडी व लोकहिताच्या विषयांवरील पत्रकार परिषद घेऊन बातम्या प्रकाशित केल्या आहेत. त्यामुळे डिजिटल मीडिया मध्ये गामा संघटनेने जिल्ह्यात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे.

संघटनेच्या कार्याची दखल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली असून सोशल मीडियावरील मोठ्या प्रमाणातील वाचकवर्ग गामा सदस्य पत्रकारांच्या बातम्यांना पसंती देत आहे.

नवीन संयोजक उदय धकाते व निलेश सातपुते यांचे ज्येष्ठ पत्रकार जयंत निमगडे,अनिल बोदलकर,व्यंकटेश दुड्डमवार, सूरज हजारे, कृष्णा वाघाडे,किशोर खेवले,बि. म्हशाखेत्री तसेच सचिन जिवतोडे, प्रवीण चन्नावार यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker