निवडणूक

गडचिरोली-चिमुर लोकसभा 71.88 टक्के मतदान

गडचिरोली,प्रतिनिधी :-

12- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण  71.88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात 69.25 टक्के, आरमोरी 73.69 टक्के, गडचिरोली 71.42 टक्के, अहेरी 66.93 टक्के, ब्रम्हपुरी 75.10 टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 74.41 टक्के मतदान झाले.

गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लक्ष 17 हजार 702 मतदार आहे. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 272 पुरुष मतदारांनी (73.06 टक्के), 5 लक्ष 67 हजार 157 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के) तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 434 (71.88 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.