आपला जिल्हाक्राईम

कबुतर देसाईगंज प्रकरण आरोपी निरीक्षण गृहात

गडचिरोली,प्रतिनिधी :-

कबुतर चोरल्याचा आरोप करून मारहाण करणाऱ्या आरोपीस बाल न्यायालयाने आरोपीस निरीक्षण गृह येथे ठेवण्याचा आदेश आज दिले आहे. 

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील राम मंदिर परिसरात कबुतर चोरल्याचा आरोप ठेऊन एका युवकाचा चिमुकल्यांना अमानुषपणे लाथा बुक्याने मारतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता .

            त्यावरून नरेश वासुदेव बघमारे वय 40 वर्ष धंदा शेती, रा राममंदिर आमगाव देसाईगंज. यांचे फिर्यादीवरुन तात्काळ पो स्टे देसाईगंज येथे गुरक्र 212/24 कलम 118(1),351(2)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व यातील आरोपी विधिसंघर्ष ग्रस्त बालक नामे आयुष अर्जुन स्वर्णकार यांस नमूद गुन्ह्यात आज रोजी ताब्यात घेऊन मुख्य न्यायाधिश,बाल न्यायालय मंडळ, गडचिरोली यांचेसमक्ष हजर केले असता त्यास दि 14/08/24 पर्यंत निरीक्षण गृह येथे ठेवण्याबाबत आदेश केलेले आहेत.

             तसेच गुन्ह्यातील पीडित बालक यांची आज रोजी वैद्यकीय अधिकारी यांचेकडून तपासणी करून घेणेत आलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहेत

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker