आपला जिल्हा

ब्रम्हपुरी जिल्हा पाहिजे उद्या सामूहिक मुंडण आंदोलन

ब्रम्हपुरी,प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा,वैधकिय,तसेच भौगोलिक परिस्थिती गौण खनिज, दळणवळणाच्या सोयी, तसेच  जिल्ह्याच्या शासकीय इमारतीची पूर्तता करणाऱ्या अनेक शासकीय वास्तू अस्तित्वात असून सुद्धा 1982 पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीकर मागील 41 वर्षापासून आंदोलन करीत आहे. मात्र आजतागायत ब्रह्मपुरीकरच्या जिल्ह्याच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले.

जिल्ह्याच्या मागणीसाठी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा,ब्रम्हपुरी बंद,धरणे आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा भाग म्हणून ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे व चिमूर येथील उप जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करून त्यात ब्रम्हपुरीचा समावेश करू नये. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या दिनांक २४जुलै २०२३ ला स्थानिक छञपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे सकाळी ११ ते २.०० वाजता सामूहिक मुंडण आंदोलन होत आहे. या आंदोलनात ब्रम्हपुरीकरानी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपस्थित रहावे  असे आवाहन ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker