मुंबई,विशेष प्रतिनिधी :-
विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुलाच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुलासाठीची आवश्यक मान्यतेसंदर्भात प्रशासकीय कार्यवाही गतीने करण्याची सूचना क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.
मुंबई येथील क्रीडा विभागाकडील मैदाने, स्टेडियम, जागा – खेळपट्टीबाबत तसेच राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा विभागाअंतर्गत खेळाडूंसाठी उपलब्ध क्रीडा संकुल, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा क्रीडा मंत्री महाजन यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव रणजीतसिंह देओल, आयुक्त सुहास दिवसे, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपसचिव सुनील हांजे, मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, राज्यात 155 क्रीडा संकुले आहेत. त्यांचा योग्य वापर आणि क्रीडापटूंना त्याचा लाभ मिळावा यासंदर्भात पाहणी करण्यात यावी. प्रगतीपथावरील 122 क्रीडा संकुलांच्या बांधकामास गती द्यावी. नवीन क्रीडा संकुल निर्मितीकरिता शासनाने निश्चित केलेल्या अनुदानानुसार प्रशासकीय मान्यता द्यावी. बहुउद्देशीय सभागृह, मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शासकीय अनुदान मर्यादेबाहेर आलेले प्रस्ताव तपासून त्यामध्ये कोणत्या सुविधा खेळाडूंसाठी प्रस्तावित आहेत, हे तपासून अनुदान मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, कुपरेज, महाराष्ट्र लॉन टेनिस, मुंबई हॉकी असोसिएशन, वानखेडे मैदान या मैदानांसह क्रीडा विभागाच्या जागांवर कार्यरत असणाऱ्या संस्थांसोबत जमिनीचा भाडेतत्वावरील करार करताना शासकीय खेळाडूंना सुविधा तसेच वेळ देण्यासंदर्भात नियम करण्यात यावेत, अशाही सूचना मंत्री महाजन यांनी केल्या.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia