आपला जिल्हा

आमदार डॉ. देवराव होळी संकल्पनेतील शासन योजनांची कॅम्पचे आयोजन

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आमदार डॉ.देवराव होळी साहेब यांचे एमएलए कॅम्पच्या माध्यमातुन शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ  मिळावा करिता या कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून   गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० लोकांची टीम बनवून मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये  घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा  प्रयत्न   गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एमएलए कॅम्पचे शुभारंभ  केले आहे.

दिनांक 16 ऑगस्ट 2024 मौजा घोट  येथे शासकीय योजनाची अंमलबजावणी  कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून त्यामध्ये खालील योजनेचे लाभ देण्यात येणार आहे

1) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

2) मुख्यमंत्री वयोश्री योजना

3) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

4) इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना

           अशा विविध प्रकारच्या योजनेचे लाभ घोट क्षेत्रातील लाभार्थ्यांनी निशुल्क स्वरूपात मिळणार आहे.

 घोट येथे  शासनाच्या योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी एमएलए कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा मानस आहे . तरी सर्व नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.