आपला जिल्हा

प्रा. संध्या येलेकर शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मुंबई, प्रतिनिधी :-

प्रा. संध्या शेषराव येलेकर राणी दुर्गावती कन्या कनिष्ठ महाविद्यालय गडचिरोली यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी टाटा थियेटर मुंबई येथे गौरविण्यात आले. रोख रुपये एक लाख दहा हजार, सन्मानाचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी मंचावर विधानसभेचे अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, प्राथमिक शिक्षण राज्य प्रकल्प संचालक आर विमला, शिक्षक आमदार किरण सरनाईक तसेच शिक्षण विभागाचे संचालक आदी उपस्थित होते.

       यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून प्रा. संध्या येलेकर यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला.

     प्रा. संध्या येलेकर शालेय कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतानाच शालाबाह्य उपक्रमात विद्यार्थिनींना भाग घेण्यास त्या सतत प्रेरित करीत असतात. अंधश्रद्धा निर्मूलन, पाणी अडवा पाणी जिरवा साठी बंधारा बांधणे, प्रतिभावंतांच्या मुलाखती इत्यादी उपक्रमात त्या मुलींना सहभागी करून घेतात. लेखन, रांगोळी चित्रकला हे त्यांचे आवडते छंद असून विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विविध कार्यक्रमाचे संचालन ,विविध स्पर्धांचे परीक्षण त्या करीत असतात.

 त्या गोंडवाना विद्यापीठाच्या माजी सिनेट सदस्य असून छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केद्राच्या त्या आजीवन सदस्य आहेत.

 नुकत्याच ओरिसा येथे संपन्न झालेल्या जांबोरीत त्यांनी रेंजर ग्रुप चे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते त्यात फूड प्लाझा या स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. मागील वर्षी मनस्विनी ऑफ द इयर ठरलेल्या प्रा. संध्या येलेकर यांना समाजसेवेसाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल कडून राष्ट्रीय स्तरावर यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे.

        महाराष्ट्र शासनाने राज्यशिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाभारत न्यूज

SHARE
वाचकांचा कौल

आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा विकासाबाबत भूमिका योग्य आहे काय ?

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.