गडचिरोली,प्रतिनिधी :-
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात भाजच्या दोन उमेदवार कडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.या मुळे भाजपा मध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत असून अद्याप भाजप च्या वतीने कोणालाच उमेदवार म्हणून घोषित केले नाही आहे. हे विशेष.
डॉ. मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. यांच्या उमेदवार अर्ज दाखल करतांना कोणताही गाजावाजा न होता नामनिदर्शन पत्र दाखल करण्यात आल्याने भाजपात भविष्यात मोठी फूट पडणार आहे. हे दिसून येते.
67-आरमोरी (अ.ज.) व 69-अहेरी (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
आज 24 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 6 व्यक्तींनी 16 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 7 व्यक्तींनी 19 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन दिवसात एकूण 137 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia