आपला जिल्हा
गडचिरोलीत दिपावली भजन पहाट कार्यक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
मानवतेचे महान पुजारी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्य दि. ३१/१०/२०२४ रोज गुरुवारला “सामुदायिक ध्यान व दिपावली भजन पहाट” चे आयोजन कमल-केशव सभागृह (कात्रटवार लॉन), चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेश कात्रटवार, सुनिल चडगुलवार (से.नि. ना.त. तथा जेष्ठ नाट्य कलावंत),प्राचार्य समशेरखाँ पठाण,लिंगाजी मोरांडे (व्यवस्थापक),मनोजसिंह पवार (शासकीस कंत्राटदार) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रम चे सुत्र संचालन प्रविण एल. मुक्तावरम् उत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त गुरुकुंज मोझरी हे करणार आहे.
– कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे.-
सकाळी ५.३० वाजता-सामुदायिक ध्यान,सकाळी ६ ते ६.३० वा.उद्घाटन समारोह,सकाळी ६.३० ते ८ वा.
दिपावली भजन पहाट कार्यक्रम
सकाळी ८ ते ८.३० वा. अल्पोपहार कार्यक्रम होणार आहे.



