गडचिरोली,प्रतिनिधी :-
आमदार डॉ.देवराव होळी हे यांना पक्षाने तिकीट नाकारताच विधानसभा मतदार संघातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र आणि कार्यकर्ते हे एकत्र येऊन भाजपा उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना विरोधात काम करण्याचा व पदाधिकारी हे संयुक्तपणे राजीनामे देण्याचा एकमताने निर्णय घेऊन वरिष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे.आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मुळे भाजपा मध्ये दोन गट आमने सामने आले.आमदार होळी हे मुंबई येथे आहेत.
आमदार डॉ. देवराव होळी यांचा गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास व त्यांचा जनतेशी असलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांना विजय मिळवून देणारा आहे. मात्र आपल्यापेक्षा कोणी मोठा नेता निर्माण होऊ नये, या भीतीने भाजपातील काही जनाधार नसलेल्या नेत्यांनी खोटया व निगचार गोष्टीचा आधार घेउन आमदार होळी यांची उमेदवारी काण्याचे पश मिळवलेले आहे. परंतु त्यांचे यश महिनाभरा पुरते आहे. त्यानंतर लोकसभेसारखी परिस्थिती गडचिरोलीमध्ये निर्माण होईल ही वास्तविकता आहे. केवळ वैयक्तिक देषातून आमदार होळी पांचा पत्ता कापण्यासाठी भाजपाच्या काही निवडक स्थानिक नेत्यांनी संपूर्ण पक्षाला वेठीस धरले आहे. ही बाब भाजप नेतृत्वाने लक्षात घ्यावी व निवडणुकीत हारणारा उमेदवार न देता जिंकून येणाऱ्या आमदार होळी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी व महायुती पदाधिकारी माणून करित आहोत.
मागील ६ महिन्यांपासून आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विविध समाजाचे सामाजिक मेळावे, हजारोंच्या उपस्थितीत लाडक्या चहिणीचे मेळावे घेऊन जनतेमध्ये आपली विजयाची प्रतिमा उभी केली आहे. प्रत्येक समाज घटकाला व पक्षातील सोना सोबत घेऊन त्यांनी मागील २० वर्षात काम केले आहे. असे असतानाही केवळ स्थानिक नेत्यांचा वैयक्तिक द्वेषाचा आधार घेऊन गडचिरोली विधानसभा क्षेत्रात उमेदवार बदललेला आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवारांचा जनतेसोबत संपर्क नाही. केवळ आमदार होळी यांना उमेदवारी मिळू नये म्हणून नाव पुढे करण्यात आले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव आजच दिसून येत आहे. दिनांक २५ सप्टेंबरला नामांकन दाखल करते वेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १२ ते १५ हजार लोकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष, महामंत्री, माजी खासदार व वरिष्ठ नेते नसतानाही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित दर्शवून आमदार होळी यांना पाठिंबा दर्शवला होता, यावरून त्यांची विधानसभा क्षेत्रात असणारी लोकप्रियता दिसून येते.
त्यामुळे पक्षाने पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने गडचिरोली मध्ये मिलिंद नरोटे यांना दिलेली उमेदवारी रद्द करून आमदार होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. मात्र वरिष्ठ नेतृत्वाने याबाबत पुनर्विचार न केल्यास गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भाजप बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, बुध पालक, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते संयुक्तपणे डॉ. देवराव होळी यांच्या समर्थनार्थ आपले राजीनामे देणार त्यामुळे याबाबत पक्षाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या माध्यमातून करित आहोत.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia