क्रीडा व मनोरंजन
विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा गाजली
गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच राजवी प्रोडक्शन मित्रपरिवार गडचिरोली द्वारा आयोजित स्वर्गीय गजू भाऊ उर्फ विवेक काशीरामजी चडगुलवार यांचे स्मरणार्थ विदर्भ स्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत विदर्भातील नाट्य कलावंतानी प्रचंड प्रतिसाद देऊन विविध अभिनय कला एकापेक्षा एक सरस विविध विषयावर सादर करून स्पर्धेत चुरस निर्माण केली.
या एकपात्री अभिनय स्पर्धेच्या माध्यमातून आज विदर्भातील 21 कलावंतांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सुरुवातीला नांदी नाट्यगीत दिवाकर बारसागडे,वैशाली मडावी मॅडम, गिरीधर दोनाडकर यांनी सादर केले.तसेच कुमारी प्रियंका रायपुरे हिने लावणी नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
सदर एकपात्री स्पर्धेत विदर्भातील १० पुरुष व १० महीला कलावंतांनी सहभाग घेतला होता.

पुरुष गटातून प्रथम क्रमांक महेंद्र गोन्नाडे,पवनी, द्वितीय क्रमांक मोरेश्वर खर्डेकर, वरोरा, तृतीय क्रमांक वसंत चापले गोगांव व प्रोत्साहन पर क्रमांक तुळशीराम उंदीरवाडे आंबेटोला यांना प्राप्त झाले. विजेत्यांना रोख रक्कम व स्वर्गीय बळीरामजी धकाते सर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शिल्ड देण्यात आली.

स्त्री गटातून प्रथम क्रमांक सौ.मंजिरीताई बाटवे गडचिरोली, द्वितीय क्रमांक ईशा मुनगेलवार चामोर्शी, डॉ.ज्योती दुपारे ब्रम्हपुरी,तृतीय क्रमांक डॉ.ज्योती कुंदन दुपारे व प्रोत्साहन पर क्रमांक शोभा तुराणकर खेमजई यांना प्राप्त झाले. विजेत्यांना रोख रक्कम व स्वर्गीय भय्याजी पवार यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शिल्ड देण्यात आली.

याप्रसंगी राजवी प्रोडक्शन गडचिरोली तर्फे झाडीपट्टी रंगभूमीवर गाजत असलेले मुन्नाभाई बिके यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन झाडीपट्टी नाट्य कलावंत पुरस्कार 2023 प्रदान करून गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून चुडाराम बल्लारपुरे, दादाजी चुधरी, सौ.मनीषा मडावी यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील चडगुलवार ,संचालन देवेंद्र दहीकर,प्रवीण मुक्ताराम व आभार प्रदर्शन डॉक्टर राकेश चडगुलवार यांनी केले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय धात्रक सर, प्रवीण मुक्तावराम, भास्कर मेश्राम, दिलीप मेश्राम, नामदेवजी ईजनकर, मारोतराव ईचोडकर,अविनाश चडगुलवार,उदय धकाते,मनोज पवार विवेक मून, खुशरंगजी शेंडे, प्रभाकरराव कुबडे,सतीश त्रिनगिरवार, जगदीश मडावी,जगदीश नरचुलवार, दीपक चडगुलवार,चैतन्य चडगुलवार यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे शेवटी राष्ट्र वंदना घेऊन सांगता करण्यात आली.




