सामाजीक
कै. विठोबाजी लटारे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूर,प्रतिनिधी :-
चामोर्शी तालुका संघचालक राहिलेले कैलासवासी विठोबाजी लटारे यांनी हिंदू विचाराने एका ध्येयाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन जगले. त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनातून एक आदर्शमय व्यक्तिमत्व समाजापुढे निर्माण केल्याचे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय महामंत्री योगेशजी बापट यांनी चामोर्शी येथील डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर द्वारा संचालित कै. विठोबाजी लटारे रुग्ण साहित्य सेवा केंद्राचे लोकार्पण करताना केले.

यावेळी संघाचे प्रांत सहप्रचारक परिक्षीतजी जावळे चंद्रपूर विभागाचे विभाग संघचालक जयंतरावजी खरवडे, डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष वसंतरावजी थोटे, गडचिरोली जिल्हा संघचालक घिसुलालजी काबर ,डॉक्टर मिलिंदजी घरोटे, प्रांताचे सेवा प्रमुख सुनीलजी मेहर, विभाग प्रचारक अश्विनी जयपूरकर यांचेसह कै. विठोबाजींच्या धर्मपत्नी व मुलगा उपस्थित होते.
संघाच्या सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लटारे परिवारांच्या सौजन्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



