आपला जिल्हादेश विदेश

लॉयड मेटल कडून सुरजागड येथे वार्षिक ६० दशलक्ष खनिज ची मागणी, २८ जानेवारी ला जनसुनावणी

उदय धकाते

गडचिरोली :-

मे.लॉयड मेटल कडून सुरजागड येथे ६० दशलक्ष खनिज ची मागणी शासनाला केली असून या वर पर्यावरण विषयक २८८ जानेवारी २०२५ ला जनसुनावणीची सुचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी जाहीर केली आहे. सुरजागड येथील लोह खनिज प्रकल्प ला स्थानिकांचा विरोध असूनही लॉयड मेटल कडून मंजूर असलेल्या खनिज पेक्षा जास्त खनिजचे काढले जात आहे.या पूर्वी जनसुनावणी हे शासकीय दडपशाही मध्ये झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या वेळी सुद्धा हाच प्रकार होण्याची शक्यता आहे.

मे. लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी लि., मौजा सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली यांनी त्याच्या कार्यरत असलेल्या खाणीच्या 348.09 हेक्टर क्षेत्रामध्ये 10 ते 25 दशलक्ष टन प्रतिवर्ष हेमेंटाइट, 45 लशलक्ष टन प्रतिवर्ष वीएचक्यू, 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष घनकचरा (एकूण उत्खननः 60 दशलक्ष टन प्रतिवर्षी यासह सुरजागड लोह खननज खाणी लीज क्षेत्रावरील फशिंग आणि रिक्रनिंग प्लांटसह लोह खनिज उत्पादन क्षेमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्याबाबत मंडळाकडे अर्ज सादर केला आहे. सदर प्रकल्पामुळे एटापल्ली तालुक्यातील पुरसलगुडी, नागुलवाडी, बांदे, मल्लमपड (मत्यमपड), मांगेर, सुरजागड, हेद्री, एकारा खु., करमपल्ली, पेठा (स), झारेगुडा, कुवरी, मोहराली ही गावे प्रभावित होणार आहेत. सदरील प्रस्तावित प्रकल्पाकरिता भारत सरकारच्या पर्यावरण व वने मंत्रालय, नवी दिल्ली चे दि. 14 सप्टेंबर, 2006 च्या अधिनियमान्वये व दि. 01 डिसेंबर, 2009 च्या सुधारित अधिनियमान्वये उपरोक्त प्रस्तावाबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी आयोजित करण्यात येत आहे.

सदर जनसुनावणी पर्यावरण विषयक बाबींबाबत घेण्यात येत असून सदर नियोजित प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवाशी, पर्यावरण विषयक काम करण्याऱ्या संस्था, सदर प्रकल्पामुळे विस्थापित होणारे रहिवाशी किंवा सदर प्रकल्पामुळे अन्य प्रकारे प्रभावित होणारे रहिवाशी यांना सदर प्रकल्पासंबंधी टिका टिप्पणी किंवा आक्षेप तोंडी किंवा लेखी स्वरुपात नोंदविता येईल.

सदर प्रकल्पासंबंधी पर्यावरण विषयक सुचना, विचार, टिका टिप्पणी तसेच आक्षेप जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसांच्या आत खालील पत्त्यावर नोंदविण्यात याव्यात.

प्रादेशिक कार्यालय व उप-प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, पहिला माळा, बस स्टॅण्ड समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर-442401फोन नं. 07172-251965 ईमेल: srochandrapur@mpcb.gov.in & rochandrapur@mpcb.gov.in

सदर जाहीर जनसुनावणी ऑनलाईन पध्दतीने Webex platform वर सुद्धा घेण्यात येणार आहे. मौखिक किंवा लेखी आक्षेप जाहिर जनसुनावणीच्या वेळेस सुध्दा नोंदविता येईल. जाहिर जनसुनावणी खालील ठिकाणी घेण्यात येईल.

दिनांक वेळ : 28/01/2025 : सकाळी 11:00 वाजता.

स्थळ : डीपीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली, ता., जि. गडचिरोली. वे. बँक्स अॅप मिटींग नंबर 2519048 2014 पासवर्ड : 28012025

Webex Meeting link

https://mpcb.webex.com/mpcb/j.php?MTID=meb07822e891e181140baf2e77e942d30

सदर प्रकल्पासाठी पर्यावरण विषयक माहिती असलेले दस्तावेज कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. संबंधित व्यक्त्ति या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये सदर दस्तावेज अभ्यासु शकतील.

1) पर्यावरण विभाग, 15 वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, महाराष्ट्र शासन मंत्रायल, मुंबई-400032

2) प्रादेशिक कार्यालय, नवीन सचिवालय बिल्डींग, वने, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालय, विसीए समोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर

3) सह संचालक (जल प्रदूषण नियंत्रण), महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, कप्लतरु पाईंट, 2 रा व 4 था माळ्ळा, सिनेप्लानेट सिनेमा समोर, सायन सर्कल जवळ, (पु) मुंबई-400022

4) प्रादेशिक कार्यालय व उप-प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उ‌द्योग भवन, पहिला माळा, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर

5) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली.

6) जिल्हा परिषद, गडचिरोली.

7) जिल्हा उद्‌योग केंद्र, गडचिरोली.

8) उप-विभागीय कार्यालय, एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.

9) तहसिल कार्यालय, एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.

10) नगर पंचायत एटापल्ली, एटापल्ली, जि. गडचिरोली.

11) पंचायत समिती कार्यालय, एटापल्ली, जि. गडचिरोली.

12) गट-ग्रामपंचायत कार्यालय पुरसलगुंडी (बांदे, मत्यमपड), मांगेर, पुस्सलगुंडी, सुरजागड (सुरजागड) व हेद्री), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.

13) गट-ग्रामपंचायत कार्यालय तोडसा (एकारा खु. (आकस्टोला), करमपल्ली, पेठा (स) व झारेगुडा (झारेवाडा), ता. एटापल्ली, जि, गडचिरोली,

14) गट- ग्रामपंचायत कार्यालय नागुलवाडी (कुदरी (कुद्री), (नागुलवाडी (नागुलपाडी), मोहराली (भोली), ता एटापल्ली, जि. गडचिरोली,

15) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संकेतस्थळ-www.mpcb.gov.in स्या/- उप-प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि. मंडळ, चंद्रपूर तथा समन्वयक, पर्यावरण विषयक जनसुनावणी.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker