आपला जिल्हाताज्या घडामोडी
विद्यार्थी जातील तलावात, नवीन शाळा बांधकाम, गावकऱ्याचं विरोध
गडचिरोली, प्रतिनिधी :-
चामोर्शी तालुक्यातील मौजा येनापूर येथील तलावाच्या पोटात नवीन शाळा इमारतीचे सुरु केलेले बांधकाम रद्द करून सुरक्षित जागेवर बांधकाम करावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली,संवर्ग विकास अधिकारी प.स. चामोर्शी.कार्यकारी अभियंता (सर्व शिक्षा अभियान) जिल्हा परिषद गडचिरोली यांना गावकर्यांनी दिले.
चामोर्शीतालुक्यातील मौजा गटग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत मौजा येनापुर जि.प. शाळेच्या नविन इमारतीचे बांधकाम मंजुर झाले असल्याने ग्रामपंचायत सरपंच व सचिव यानी पाच महिन्या पूर्वी निलकंठ निखाडे, सरपंच यांनी वनविभागाच्या दुर्गापूर हद्दीमध्ये तलाचाच्या पोटात खोदकाम करून शाळा बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी सुध्दा गावक-यांनी तलावाच्या पोटात शाळा इमारतीचे बांधकाम करण्यास विरोध करून बांधकाम थांबविले होते.
परंतु परत त्याच ठिकाणी तलावाच्या पोटात मागील बांधकाम केलेल्या जागेच्या बाजुला परत ले ऑऊट देवून। बांधकामा करीता सुरुवात केलेली आहे.

सदर या नवीन शाळा ईमारतीचे तलावाच्या पोटात बांधकाम केल्यास तलावात पाणी राहत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होउन तलावात पाणी राहत असल्यान मुलांच्या जिवास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर जागा दलदलीची असल्याने इमारतीचे बांधकाम सुध्दा कोसळण्याची शक्यता आहे. तसेच तलावा खाली शेतकऱ्यांची शेती असुन शेतीतील धान पिकाचा उत्पन्ना घेवुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करित आहे. सदर इमारतीमुळे तलावाची पार फोडण्याची पाळी आल्यास शेतकऱ्यांची उपासमारीची पाळी येऊ शकते.
तरी वरील बाबीचा विचार करून दुसन्या सुरक्षीत ठिकाणी शाळच्या ईमारतीचे बांधकाम करण्यात यावे, यापूर्वी सुध्दा सरपंच व सचिव संगणमत करून ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार केल्याचे अनेक तक्रारीसुध्दा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये करण्यात आलेले आहे. तरी आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.असा आरोप गडचिरोली ऑल मीडिया असोसिएशन च्या पत्रकार परिषद मध्ये पालक आणि गावकर्यांनी केला आहे.




