गडचिरोली, प्रतिनिधी :-
भंगार अवस्थेत असलेले राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस बंद करा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने विभागीय नियंत्रक यांना करण्यात आली आहे.
गडचिरोली व सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक तसेच शालेय मुला-मुलींच्या सद्या सुरु असलेल्या भंगार बसेस सुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पण बहुतांश भंगार अवस्थेतील बसेस जिल्ह्यात धावत आहे. काही प्रवासी ग्राहकांचे जीव धोक्यात आणणारे हे प्रवास आहे. त्यामुळे नागरिकांचा व शाळेतील मुला-मुलींचा आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न जैसे थेच असून हा गंभीर विषय झालेला आहे.
आपल्या जिल्ह्यातील हजारो प्रवासी तसेच शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अश्या प्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भंगार बसेस चा हा गंभीर विषय झाला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना व विध्यार्थ्यांना होत आहे आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न आहे तसाच राहणार आहे.
जिल्ह्यातील प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने एक छोटासा निर्णय म्हणून आपल्या आगार नवीन बसेस करिता तात्काळ उपाय योजना करावी. हजारो प्रवासी ग्राहकाकडून अशी मागणी केली आहे. यापुढे भंगार बसेस चा वापर करू नये असे आदेश देण्यात यावे.
याबाबत विभागीय नियंत्रक अशोक वाडिभस्मे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव उदय धकाते, संघटक विजय कोतपल्लीवार, अरुण पोगळे आदी उपस्थित होते.
Back to top button