आपला जिल्हा

कलार समाजाचे स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न

गडचिरोली, प्रतिनिधी :-

कलार समाज संघटना गडचिरोली तर्फे २५ जानेवारीला अभिनव लॉन गडचिरोली येथे स्नेहमिलन व हळदिकुंकु कार्यक्रमाचे उदघाटन नामदार ॲड. आशिष जयस्वाल, सह पालकमंत्री गडचिरोली यांचे हस्ते करण्यांत आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, माजी जि.प. अध्यक्ष हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार मिलींद नरोटे, सचिन उके, निरंजन पाटील वासेकर, हेमंत जंबेवार, रविंद्र वासेकर, दिनेश पा. चिटनुरवार, सुनिल चडगुलवार, श्रीनिवासजी दुल्लमवार, दामोदर मांडवे, संजय गैनवार, शालीकजी बहीरवार, मंजुताई वासेकर, संगीता अतकमवार, वैशाली मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात नामदार अॅड आशिष जयस्वाल, सह पालकमंत्री गडचिरोली यांचे हस्ते सरदार विर पापन्ना गौड, रेणुकामाता, श्रीगणेश, यांचे प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यांत आली. समाजातील सर्व प्रवर्गातील बंधु भगिनिंनी हा सोहळा घडवून आणला त्याबददल आयोजकांचे अभिनंदन करुन आपला समाज हा परिवर्तनशिल असला पाहीजे त्यासाठी शैक्षणीक, आर्थीक, सामाजीक उन्नती करण्याचा प्रयत्न संघटीतपणे करावा. यासाठी मदत करण्याचा मी निश्चीतच प्रयत्न करेन असा विश्वास नामदार अॅड आशिष जयस्वाल, सह पालकमंत्री गडचिरोली यांनी उदघाटकीय मार्गदर्शन करतांना समाज बांधवांना दिला.

अध्यक्षीय पदावरुन मार्गदर्शन करतांना प्रकाश पाटील मारकवार यांनी सर्व वर्गीय कलार समाज बांधवानी यापुढे एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. समाजातील गरीब कुटूंबाना आर्थीक मदत, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक मदत, विवाह मेळावे, परिचय मेळावे असे उपक्रम यापुढेही राबविण्यांत यावे असे मत व्यक्त केलें.

तसेच स्नेहमिलन कार्यक्रमात काशिरामजी चडगुलवार, प्रशांत पा. चिटनुस्वार, किर्तनलाल मेश्राम, नामदेवजी बनसोड, मोरेश्वर वालोदे, मल्लेशजी वंगेवार, अनिल तिडके, विठठल मुत्येमवार, मनोज मारगोनवार, प्रभाकरजी मंडावार, सदाशिव मंडावार, रविंद्र रंगुवार, राजेशजी महाजन, फकीराजी गडडमवार, शोभाताई मंडलवार, लिलाताई मारकवार, मायाताई वासेकर निर्मलाताई चडगुलवार, गिताताई वासेकर, विजयालक्ष्मी जंबेवार, उज्वलाताई वालोदे, रेखाताई मेश्राम, ज्योतीताई चिटनुस्वार, राधा गणवेनवार, वैशाली गणवेनवार, मनिषा शंकरवार, स्वाती वासेकर, वैशाली गडडमवार, भावना बावनथळे, सौ. संगिता मुत्यलवार, रेणुका चिटनुवार, मयुरी पडालवार, सुनिता शंकरवार, अर्चना रामगोणीवार, नंदा सहदेवकर, सुनिता हजारे यांचे उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. स्नेहमिलन कार्यक्रमास कलार समाजाचे जवळपास ४०० महिला, पुरुष व बालगोपाल उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. राकेश चडगुलवार तर आभार प्रदर्शन दिलीपजी मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी छत्रपती शंकरवार, विजय मारकवार, दिपक चडगुलवार, चैतन्य चडगुलवार यांनी सहकार्य केले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker