आपला जिल्हा
गडचिरोली येथे माता रमाई जयंती साजरी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील आम्रपाली बुद्ध विहार येथे भा.बौ.म.सभा महिला वार्ड शाखा आणि फुले वार्ड बौद्ध समाज यांचे संयुक्त विद्यमाने माता रमाई यांची जयंती आज दि.७/०२/२०२५ रोज शुक्रवारी सायंकाळी ७:३० वाजता म. फुले वार्ड उत्साहात साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी आयु.यशवंत वंजारे उपस्थित होते. प्रतिमा पुजन, दीप प्रज्वलन आणि त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाचा सुरूवात करण्यात आली.
भा.बौ.म.सभा जिल्हा शाखा गडचिरोली (उत्तर) चे प्रचार व पर्यटनचे उपाध्यक्ष लहू रामटेके गडचिरोली यांनी “माता रमाई यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि खडतर जीवन” यावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त करून सर्व उपासक आणि उपासिकांना मार्गदर्शन केले.




