आपला जिल्हाताज्या घडामोडी

परीक्षा केंद्रावर उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात, 

केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक निलंबित…❓

गडचिरोली, प्रतिनिधी :-

१२ विच्या परीक्षेच्या दोन दिवंसापूर्वी सामूहिक कॉपीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले होेते.परंतु तेच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात भरारी पथक ला आढळून आल्याने राज्यात खळबळ माजली आहे.सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करुन दोषी शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी, असे असेमुख्यमंत्री यांनी म्हटले होेते.केंद्रप्रमुख व पर्यवेक्षक निलंबत करा असा आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे यांनी संस्थेला दिले आहे.

 चक्क उत्तरे लिहिलेली प्रश्नपत्रिकाच विद्यार्थ्यांना दिल्याचा धक्कादायक प्रकार मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर उघडकीस आला आहे. हिंदी विषयाच्या पेपरला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे यांच्या भरारी पथकाने दिलेल्या भेटीत हा प्रकार समोर आला आहे. यानंतर शिक्षण मंडळाच्या सुचनेनुसार केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होणार काय?

दोन दिवंसापूर्वी सामूहिक कॉपीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले होेते. सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करुन दोषी शिक्षकांवर बडतर्फीची कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले होेते. मुख्यमंत्री फडणवीस हे पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीतील सामूहकि कॉपी प्रकरणात या आदेशाची अंमलबजावणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्याबारावी परीक्षा सुरु आहेत. १२ फेब्रुवारी रोजी हिंदी विषयाचा पेपर झाला. मुलचेरा येथील शहीद बाबूराव शेडमाके विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर (क्र. ६३७)केंद्रप्रमुख म्हणून एस.वाय.पथारे तर पर्यवेक्षक एम.एम.खोब्रागडे कर्तव्यावर होते. पेपर सुरु असताना शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्या पथकाने भेट दिली असता १८ पैकी १४ विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर शिसपेन्सिलने उत्तरे लिहिलेली आढळली, तर काहींनी ही उत्तरे खोडलेली दिसून आले. सामूहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वासुदेव भुसे यांनी सविस्तर अहवाल शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागीय सचिवांना पाठवला. त्यानंतर विभागीय सचिवांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी भुसे यांनी शिक्षण संस्थेला पत्र लिहून संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले. २५५ पानांचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांना सादर केला आहे.. यात विद्यार्थ्यांकडील १४ प्रश्नपत्रिका, १८ विद्यार्थ्यांचे जबाब, लिपिक, पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांच्या जबाबाचा समावेश आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी मागवले आहेत. या वेळेत केंद्रात कोण आले व विद्यार्थ्यांना कोणी उत्तरे सांगितली हे उघडकीस येईल. त्यानंतर फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker