आपला जिल्हा

गडचिरोलीत शिक्षकेत्तरांचे धरणे आंदोलन संपन्न 

गडचिरोली,प्रतिनिधी : –

 जिल्हाधिकारी गडचिरोली कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील खाजगी   शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या आज वतीने गुरुवार ६ मार्च २५ ला तास धरणे आंदोलन – सत्याग्रह करण्यात आले.शासनाला निवेदन जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक, गडचिरोलीयांना देण्यात आले.

राज्यातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारीचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी केले.

शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांना निवेदन देतांना पदाधिकारी

राज्यात शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०:२०:३० वर्षाचा लाभतत्काळ मिळावा, पात्र शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेस लागू करण्यात आला तेंव्हा पासून तो लागू करण्यात यावा यांसह शासन दरबारी असणाऱ्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षकेत्तर सेवकांनी धरणे आंदोलनात  जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटना, गडचिरोली चे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, कार्याध्यक्ष संदीप भरणे, नंदलाल लाडे, भूपेश वैरागडे, अभिजित शिवणकर, विलास चलाख सह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.

निवेदन देतांना पदाधिकारी
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker