ताज्या घडामोडी
ते माओवादी अल्पवयीन नाहीत त्यांना आज अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-
अबुझमाड परिसरातील मौजा बिनागुंडा येथून दिनांक 20/05/2025 रोजी अटक करण्यात आलेल्या एकूण पाच माओवाद्यांपैकी दोन माओवाद्यांनी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र काल त्यांची वैद्यकीय चाचणी करून आलेल्या रिपोर्टनुसार सदर दोन्हीही माओवादी हे अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावरून आज दिनांक 23/05/2025 रोजी अप. क्र. 3/25 लाहेरी उपपोस्टे, या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी
राधिका बुचन्ना मडावी (सदस्य प्लाटून 32) रा. नेंडरा ता. बासागुडा जि. बिजापुर (छ.ग.)
पोडिया आयतु कुंजाम (सदस्य प्लाटून 32) रा. मरतुर जि. बिजापुर (छ.ग.)



