आपला जिल्हा
नगाजी महाराज मंदिराच्या वालकंपाऊंड प्रशासनाने पाडले

गडचिरोली,प्रतिनिधी :-
शहरातील नागजी महाराज यांचे देवस्थान चे सरंक्षण भिंतीचे बांधकाम नगर परिषदेने पाडल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने या बाबत शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गडचिरोली नगर परिषद क्षेत्रांतर्गत सर्व्हे क्र. ७२/२ मध्ये प्लॉट क्र. १ सौ. शालुलाई खुशरंग शेंडे रा. कन्नमवारनगर, गडचिरोली यांचा मालकीचा आहे.त्यांनी हा प्लॉट नगाजी महाराज मंदिराकरीता दान केला आहे. त्यामुळे तेथे सार्वजनीक नगाजी महाराज मंदिर बांधले आहे. नगाजी महाराज मंदिराच्या पश्चिमेला नगर परिषदचा कोणताही रस्ता नाही. असे असतांना नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी जेसीबी मशिन घेऊन आले व नगाजी महाराज मंदिराची पश्चिमेकडील वालकंपाऊंड तसेच संडास, बाथरुम तोडून टाकले.
हि कारवाई सुरु असतांना सौ. शालुलाई खुशरंग शेंडे यांच्या पतीला माहीत होताच मोक्यावर धाव घेतली व त्यांना सदरचे बांधकाम पाडण्यास अटकाव केला असता नगर परिषद कर्मचारी आपले जेसीबी मशिन घेऊन पळून गेले.



