गडचिरोली, प्रतिनिधी –
सावन महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात भक्तिभावाने ओथंबलेली कावड यात्रा सुंदरकांड भजन मंडळाच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेत गडचिरोली व परिसरातील शेकडो हिंदू धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला.
या कावड यात्रेची सुरुवात शहरातील त्रिमूर्ती चौकातील दुर्गा मंदिरातून झाली. यात्रा गांधी चौक मार्गे शहराची परिक्रमा करत चामोर्शी तालुक्यातील प्रसिद्ध मार्कंडेय तीर्थक्षेत्र (विदर्भाची काशी) कडे रवाना झाली. यात्रा दरम्यान “हर हर महादेव”, “बम बम भोले” च्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते.
विशेष म्हणजे, महिलांनीही आपल्या खांद्यावर कावड वाहत यात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला, ज्यामुळे उत्सवाला एक वेगळीच भक्तिमय झळाळी मिळाली.
यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी यात्रेकरूंसाठी चहा, नाश्ता आणि भोजन यांची व्यवस्था करण्यात आली होती. माजीसा मिष्टान्न भंडाराचे मालक मदनसिंग राजपुरोहित यांनी यात्रेकरूंच्या भोजनाची तर, बालाजी बीकानेर मिठाईचे राजूसिंग राजपुरोहित यांनी यात्रेसाठी धार्मिक छपाई असलेले टी-शर्ट पुरवले.
शहरात यात्रा सुरू असताना वातावरणात एक विशेष श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचे वलय अनुभवायला मिळाले. भक्तांनी शंकर भगवानाच्या जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमून टाकले होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button