आपला जिल्हा
गडचिरोली पुन्हा महिला राज ! नगराध्यक्ष पदासाठी खुला महिला प्रवर्ग

गडचिरोली, प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील १४७ नगरपरिषदां आणि २४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
या सोडतीत गडचिरोली नगरपरिषद अध्यक्षपद “खुला महिला प्रवर्गासाठी” राखीव जाहीर करण्यात आले आहे. या निकालानंतर शहरातील निवडणूक वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे. बरेच पुरुष इच्छुक उमेदवार बाशिंग बांधून तयारीस लागलेले असताना, या आरक्षण सोडतीने त्यांचा हिरमोड झाला आहे.



