आपला जिल्हा
गडचिरोली काँम्पलेक्स येथे शितल ब्युटी अॅकॅडमीचे डॉ.अशोकजी नेते यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली शहरातील काँम्पलेक्स टी-पॉईंट येथे शितल ब्युटी अॅकॅडमी चे उद्घाटन माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “आजच्या काळात व्यक्तिमत्त्वाची देखभाल आणि सौंदर्य हे आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्वाचे साधन बनले आहे.शितल ब्युटी अॅकॅडमीमुळे स्थानिक महिलांना तसेच तरुणींना स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल. या उपक्रमामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. शितल अॅकॅडमीच्या संचालकांना मनःपूर्वक शुभेच्छा,”असे प्रतिपादन त्यांनी केले.




