गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली येथील शिक्षण विभागाचे लेखाधिकारी मा. श्री. तुकारामजी साळुंखे हे नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्याने आज गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटना, गडचिरोली यांच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.
दुपारी १२ वाजता लेखाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. साळुंखे यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी शिक्षण विभागातील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याबद्दल उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी नवनियुक्त लेखाधिकारी श्री. प्रफुल वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्य गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा कार्यवाह उदय धकाते यांनी श्री. साळुंखे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.त्यांना गडचिरोली ची आठवण म्हणून भेट वस्तू दिली.
कार्यक्रमाला शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, जिल्हा पदाधिकारी शैलेश कापकर, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, अभिजित शिवणकर, किशोर गेडाम, लाडवे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री. तुकाराम साळुंखे यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुषी निवृत्त जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia