आपला जिल्हाराजकीय

भाजपाचा दमदार निर्णय : नगराध्यक्ष पदासाठी प्रणोती सागर निंभोरकर (भांडेकर

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली ‘नव्या नेतृत्वाला संधी’ ही भूमिका अधोरेखित करत प्रणोती सागर निंभोरकर (भांडेकर) या सक्षम व तत्पर कार्यकर्त्या नेत्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली. पक्षाच्या निर्णयानंतर आज त्यांनी मोठ्या शोभायात्रेत आणि उत्साहात आपले नामांकन दणक्यात दाखल केले.

नामांकनाच्या वेळी भगवा ध्वज, घोषणाबाजी, आणि ‘भाजप विजयी होणारच’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून वातावरण अक्षरशः निवडणूक उत्सवात परिवर्तित झाले होते. पक्षाच्या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

भाजपाच्या नव्या नेतृत्वावर विश्वासाचे मोठे प्रतीक म्हणून पाहिले जाणारे हे उमेदवारी निर्णय प्रतिस्पर्ध्यांसाठीही आव्हानात्मक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नामांकनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा निनाद आणि जल्लोषात ‘जय भाजपा’च्या घोषणांनी शहराला रंगवून टाकले.

प्रणोती निंभोरकर यांनी बोलताना शहराचा सर्वांगीण विकास, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, तरुणांसाठी संधी आणि पारदर्शक प्रशासनाचा निर्धार व्यक्त करत, “गडचिरोलीची सेवा हीच माझी प्राथमिकता” असे ठाम शब्दांत सांगितले.

भाजपाच्या दमदार नेतृत्वाला साथ आणि जनतेच्या आशीर्वादाने गडचिरोलीत कमळ फुलवण्याचा विश्वास आजच्या नामांकनाने आणखी बळकट झाला आहे.

नामांकन दाखल करतांना आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार बंटी बांगडीया, माजी आमदार डॉ. देवराव होळी,भाजपा जिल्हाधक्ष रमेश बारासागडे, निरीक्षक प्रशांत वाघरे सह पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker