राज्यस्तरीय ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह
गडचिरोली, प्रतिनिधी :-
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार संस्था गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ३६ वा अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह दिनांक ८ ते १२ जानेवारी २०२६ ला येथे साजरा होत आहे.
या सप्ताहात महाराष्ट्रातील १५ अंध विद्यालयातील इयत्ता १ली ते १० वी चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थाच्या विविध शालेय स्पर्धांचे आयोजन होणार असून या वक्तृत्व, काव्यवाचन, गायन,ब्रेल वाचन, नृत्य, निबंध लेखन, मनाचे श्लोक व प्रश्न मंजुषा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी समस्त गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक संस्था व्यक्ती,दानदाते यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रवास, निवास, भोजन व बक्षिसे अश्या संपूर्ण व्यवस्थे करिता दानशूर, सामाजिक संस्थे कडून सहकार्याची आवश्यकता आहे, या साठी मदतीकरिता आयोजक यांनी यावेळी आवाहन केले आहे.
अंध विद्यार्थी यांची दिनांक ८ जानेवारी ला सकाळी शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. या स्पर्धेला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, खास गडचिरोलीकरा करिता विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, (अशी रंगली रात्र ), रोशनी म्युजिकल ग्रुप आर्केष्टा, नागपूरचे आयोजन केले आहे.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र व मैत्री परिवार शाखा गडचिरोली सहकार्याचे आव्हान करीत आहे. गडचिरोली वासियांच्या मनोरंजना करता दिनांक १०/१/२०२६ ला संध्याकाळी ६ वाजता रोशनी म्युझिकल ग्रुप नागपूर यांचा ओर्केस्टा मनोरंजनासाठी कार्यक्रम आयोजित केले आहे.त्याचा आवश्य लाभ घ्यावा.
या पत्रकार परिषदला भोजराज पाटिल उपाध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र, सुहास खरे अध्यक्ष माऊली मित्र मंडळ नागपुर ,निरंजन वासेकर अध्यक्ष मैत्री परीवार गडचिरोली, अविनाश चडगुलवार सचिव मैत्री परीवार गडचिरोली,अश्विनी भांडेकर महीला प्रमुख मैत्री परीवार गडचिरोली, प्रकाश मुद्दमवार सभासद मैत्री परीवार, प्रमोद धात्रक सभासद राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र आदी उपस्थित होते.



