गडचिरोली,प्रतिनिधी :-
बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रिय अध्यक्ष एड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस अर्थात १० मे स्वाभिमानी दिनानिमीत्य वंचित बहुजन आघाडीच्या वतिने ६९ कार्यकर्त्यांच्या रक्तदानासह सामान्य रुग्णालय व महिला रुग्णालयात फळं वाटप व येथिल इंदिरा गांधी चौकात केक कापून शितपेयाचे पॉकेट वाटप करण्यात आले.
जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबवून एड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला.
६९ कार्यकर्त्यांचे रक्तदान व फळ वाटप केल्या नंतर येथिल इंदिरा गांधी चौकात सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष टेंभुर्णे होते. तर जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, महासचिव योगेंद्र बांगरे, जेष्ठ नेते सिताराम टेंभुर्णे, संघटक धर्मेंद्र गोवर्धन, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, विलास केळझरकर, कृष्णा रोहनकर, रवी केवटकर आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यकर्माचे प्रास्ताविक शहर महासचिव सोनलदिप देवतळे यांनी केले तर संचालन तालुका उपाध्यक्ष मुकेश डोंगरे व आभार जावेद शेख यांनी मानले.
दिवसभरातील सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी, किरण हजारे, रवी निकोडे, भारत रायपूरे, क्रिष्णा शेंडे, महागू शेंडे, आशिष केळझरकर, वैभव कोटांगले, कवडू दुधे, प्रविणय खोब्रागडे आदिंनी अथक परिश्रम घेतले.
Back to top button