गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असून, स्थानिक जनतेला त्याचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी ऑनफिल्ड कामकाजावर भर द्यावा, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. जिल्ह्यात युवक कौशल्यविकास, शिक्षण विस्तार आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रस्ते, आरोग्य व पाणीपुरवठा योजनांतील दिरंगाई टाळण्याच्या सूचना देत परवानगी प्रक्रियेमुळे विकासकामे रखडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.