क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

सायकलपटूंच्या सुरक्षिततेसाठी युसीआय मानकांनुसार अत्याधुनिक वैद्यकीय सज्जता

पुणे, क्रीडा प्रतिनिधी :-

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेदरम्यान सायकलपटूंच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने युसीआय (UCI) मानकांनुसार अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सज्ज करण्यात आल्या आहेत. कोणतीही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी व्यापक आरोग्य व्यवस्थेची उभारणी करण्यात आली आहे.

स्पर्धा मार्गावर प्रत्येक ८ किलोमीटर अंतरावर वैद्यकीय पथक, तर प्रत्येक २५ ते ३० किलोमीटरवर प्रगत जीवनरक्षक सेवा (ALS) मोबाईल आयसीयू युनिट तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक मार्गाच्या सुरुवात व शेवटच्या ठिकाणी स्वतंत्र मेडिकल बेस कॅम्प उभारण्यात आले असून, डोंगराळ व घनदाट परिसरात दर ५ किलोमीटरवर अतिरिक्त वैद्यकीय पथके उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.

घाट, तीव्र वळण, चढाव, पूल व गर्दीच्या ठिकाणी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली असून नदी व ओढ्यांच्या परिसरात आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धा मार्गाच्या २० ते २५ किमी त्रिज्येत येणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांशी समन्वय साधण्यात आला आहे.

१०८ रुग्णवाहिका सेवेसह खासगी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून सर्व वाहनांमध्ये जीपीएस, वॉकी-टॉकी व लाईव्ह ट्रॅकिंग प्रणाली उपलब्ध आहे. प्रत्येक मार्गावर किमान दोन रुग्णवाहिका तैनात असून त्या थेट १०८ नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्या आहेत.

गंभीर अपघातांसाठी ट्रॉमा केअर, आयसीयू आणि स्पोर्ट्स इन्ज्युरी युनिट असलेली रुग्णालये ‘स्तर-१ आपत्कालीन रुग्णालय’ म्हणून तर इतर रुग्णालये ‘स्तर-२ सहाय्यक रुग्णालय’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आली आहेत. सर्व वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व रुग्णालयांमध्ये समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र आरोग्य आदेश व समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

लाईव्ह डॅशबोर्ड, मोबाईल ॲप व रेडिओ ट्रॅकिंग प्रणालीद्वारे संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेवर रिअल टाइम नियंत्रण ठेवण्यात येत आहे. युसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार औषधे, ट्रॉमा किट, प्रथमोपचार संच, जीवनरक्षक साहित्य व आपत्कालीन उपकरणे सर्व पथकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ही वैद्यकीय सज्जता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची सक्षम आरोग्य व्यवस्था अधोरेखित करणारी ठरत असून, खेळाडूंच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker