ताज्या घडामोडी

अर्थप्राप्तीसाठी नव्हे, तर अर्थपूर्ण जगण्याचा संदेश : डॉ. अभय बंग

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ नव्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना “केवळ नोकरीसाठी न जगता अर्थपूर्ण जीवन जगावे” असा संदेश दिला. समाजाभिमुख, कौशल्याधारित शिक्षणातून युवकांनी रोजगारनिर्मितीक्षम बनावे, असे त्यांनी सांगितले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. त्यांनी विद्यापीठाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत आगामी काळात विद्यापीठ देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी सुवर्णपदक, आचार्य, पदवी व पदव्युत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. विविध विद्याशाखांतील ९६ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी तर ४३ पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker