ताज्या घडामोडी

पोटफोडी नदी पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा रस्ता रोखो आंदोलन — युवक काँग्रेसचा इशारा

पोटफोडी नदी पुलाचे काम तात्काळ पूर्ण करा; अन्यथा रस्ता रोखो आंदोलन — युवक काँग्रेसचा इशारा

गडचिरोल, प्रतिनिधी :-

राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 वरील शिवनी ते पोटफोडी नदीदरम्यान कंत्राटदाराने अर्धवट सोडलेल्या रस्ता व पुलाच्या कामामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तब्बल वर्षभरापासून काम रखडले असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मृत्यूच्या सापळ्यातून प्रवास करावा लागत आहे.

धुळीचे साम्राज्य, मोठमोठे खड्डे आणि अपघातांची वाढती संख्या यामुळे विद्यार्थी, रुग्णवाहिका, महिला व शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत. प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष न दिल्यास गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून रस्ता रोखो व तीव्र जनआंदोलन छेडेल, असा ठाम इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांना देण्यात आला.

निवेदन देताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, जिल्हाध्यक्ष नितेश राठोड यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker