आपला जिल्हा
भाजपच्या गडचिरोली जिल्हा महिला अध्यक्षपदी सौं. योगिता प्रमोद पिपरे यांची नियुक्ती

गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली नगरपरिषदेच्या अध्यक्षा तथा भाजपच्या जिल्हा महामंत्री सौं. योगिता प्रमोद पिपरे यांची भाजपा महिला आघाडीच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे श्रेय त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आमदार रवींद्र चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष मा. चित्राताई वाघ, खासदार अशोकभाऊ नेते, जिल्हाध्यक्ष रमेशभाऊ बारसागडे, तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार श्रीकृष्ण गजभे, भाजपा नेते बाबुराव कोहळे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, किसन नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रमोद पिपरे (माजी सभापती न.प. गडचिरोली), गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, तसेच महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सौं. रेखाताई डोळस आणि महामंत्री सौं. गीता हिंगे यांना दिले आहे.

सौं. योगिता पिपरे यांनी यापूर्वी महिला आघाडी प्रभारी आणि भाजपा जिल्हा महामंत्री म्हणून कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कुशल नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांची ही महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली.
सौं. पिपरे यांनी आपल्या निवडीबद्दल सर्व वरिष्ठ नेत्यांचे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पक्षवाढीसाठी झपाट्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या नियुक्तीनंतर गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक महिला पदाधिकारी, ओबीसी समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत स्वागत केले आहे.



