आपला जिल्हाताज्या घडामोडी

आकर्षक बैलजोड्यांची सजावट; नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांच्या हस्ते बालगोपाळांचा गौरव

गडचिरोली,प्रतिनिधी :-

लहान मुलांचा आवडता आणि महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा तान्हा पोळा सण गडचिरोली शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी बालगोपाळांनी लाकडी व मातीच्या बैलजोड्या आकर्षक पद्धतीने सजवून आणल्या होत्या. रंगीबेरंगी सजावट, फुलांची आरास आणि पारंपरिक वेशभूषेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलांनी आपल्या बैलजोड्यांची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखविला.

यावेळी नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर व नगरसेवक सागर अरुण निंबोरकर यांनी उपस्थित बालगोपाळांचे कौतुक करून त्यांना भेटवस्तू दिल्या तसेच तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या.

तान्हा पोळा हा केवळ बालगोपाळांच्या आनंदाचा सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नाते, कष्टाचे महत्त्व आणि कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उत्सव आहे. लहान मुलांना आपल्या परंपरा व संस्कृतीची ओळख व्हावी आणि ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, यासाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे.

उत्साह, आनंद आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडवत गडचिरोलीत तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker