अपघातआपला जिल्हाताज्या घडामोडी

गडचिरोली-चामोर्शी मार्गावर बस पलटी; शिवणी गावाजवळ अपघात

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर घटना; अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गडचिरोली शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर चामोर्शी–गडचिरोली मार्गावरील शिवणी गावाजवळ बस पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये प्रवासी असल्याची माहिती असून जखमींची संख्या व त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. अपघाताचे नेमके कारणही स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. या अपघाताबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker