आपला जिल्हाताज्या घडामोडी
वसंत विद्यालयात जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव उत्साहात
कोंढाळा जि.प. शाळेचा प्रथम क्रमांक; सैनिकी गोंडवाना विद्यालय द्वितीय तर यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल तृतीय

गडचिरोली, प्रतिनिधी :-
चांदा शिक्षण मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित वसंत विद्यालय, गडचिरोली येथे माध्यमिक शिक्षण विभाग, गडचिरोली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रथम क्रमांक प्राप्त शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती व ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. वंशिका झंजाळ, ग्रीष्मती नागोसे, सिमरन लेंगुरे, द्रिशिका सुरपाम व मुस्कान फुलझेले यांनी सुमधुर स्वागतगीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंग गेडाम यांनी केले. प्रमुख अतिथी गटशिक्षण अधिकारी दीपक देवतळे यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी विज्ञान नाट्यस्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या आंगिक कलेचा विकास होतो, असे मत व्यक्त केले.
यावेळी वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुचिता कामडी व पर्यवेक्षक प्रभाकर मंदूरकर उपस्थित होते.
कोंढाळा शाळेची विभागीय स्तरासाठी निवड


