आपला जिल्हा
जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा : डाव्या पक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली,प्रतिनिधी :-
परतीच्या पावसाने गडचिरोली जिल्ह्यात हाहाकार माजवला असून जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या धानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेले धान सडल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शून्यावर आले आहे. या परिस्थितीत संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या मागणीचे निवेदन सादर केले.


