आपला जिल्हाताज्या घडामोडी
नगरसेवकावर फसवणुकीचा आरोप, कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
चामोर्शी येथील काही महिलांनी नगरसेवक आशीष अरुण पिपरे व त्यांच्या पत्नी नगरसेविका सोनाली पिपरे यांच्यावर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून आरोपींना अटक करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पीडित महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, २०२० मध्ये स्वयंपूर्ण रोजगार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत आशीष पिपरे यांनी सुमारे ४० महिलांना स्वतःच्या घरी बोलावून बैठका घेतल्या. अगरबत्ती निर्मिती प्रकल्पासाठी बँकेमार्फत कर्ज मंजूर करून देतो व कर्ज माफ करून देतो, असे सांगून प्रत्येक महिलेकडून अर्ज घेतल्याचा आरोप ऑल गडचिरोली मीडिया असोसिएशन च्या पत्रकार परिषद मध्ये करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषद ला सौ. कविता दिलीप किरमे,सौ. मीनाक्षी देवराव पिपरे,सौ. देवांगना महेश गौतम,निवृत्ता प्रकाश गव्हारे,निहल्ला प्रकाश गृच्छारी,शीला पुरुषोत्तम धोडरे,एस पी धोडेरे,सौ. कविता रवी कारडे,सौ कविता रवि कारडे, सौ. सुषमा सतीश धोडरे, सौ. रेखा सुनील गव्हारे, सौ. छाया उमाजी बोदलकर,सौ. मेनू विनोद धोडरे, वेणू विनोद घोरे,सौ. अनिता गुणवंत पिपरे,सौ अनिता पिके,सौ. मनीषा योगेश्वर गव्हारे, सौ. सुषमा राजेश बुरांडे,सौ. सुषमा राजेश बुरोडे, सौ. अर्चना किशोर बुरांडे,सौ. शारदा बबन पिपरे,सौ. साधना बाळा धोडरे,सौ. एस, बी धोडरे, सौ. जयश्री रमेश पिपरे,सौ. वंदना सविंद्र कोठारे,सौ. अर्चना सुनील धोडरे,श्री. चंद्रशेखर हरिश्चंद्र मस्के,श्री. ओमदास कवडू झरकर, श्री. नितेश दत्तू पिपरे,श्री. मिलिंद नामदेव भांडेकर,सौ. आश्विनी धनराज गव्हारे आदी उपस्थित होते.
या सर्व महिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या खात्यात प्रतीकात्मक रक्कम जमा करून बँकेशी संगनमत साधून प्रत्येक लाभार्थ्याच्या नावावर अंदाजे १ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यानंतर या कर्जातील मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून गुजरातमधील कंपनीकडून अगरबत्ती बनविण्याच्या मशीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मशीन महिलांना न देता स्वतःच्या ठिकाणी ठेवून मोठा प्रकल्प सुरू केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



