ताज्या घडामोडीदेश विदेश
बेपत्ता मुलांमागे देशव्यापी टोळीचा संशय; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला इशारा

नवी दिल्ली, प्रतिनिधी :-
देशभरात वाढत असलेल्या मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत केंद्र सरकारला कठोर तपासाचे निर्देश दिले आहेत. या घटनांमागे देशव्यापी टोळी किंवा संघटित गट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणांमध्ये ठराविक पद्धत किंवा पॅटर्न आहे का, याचा शोध घेणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. देशातील सर्व राज्यांकडून बेपत्ता मुलांची माहिती एकत्र करून संपूर्ण चित्र समोर आणण्याचे आदेश केंद्राला देण्यात आले आहेत.



