गडचिरोली, प्रतिनिधी :-
शासकीय नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानाच्या कुटुंबीयांची तब्बल २ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१३ मध्ये तोडगट्टा जंगल परिसरात पोलिस व माओवादी चकमकीत पोलीस कर्मचारी गणपत नेहरू मडावी शहीद झाले होते. त्यांच्या वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी त्यांचा मुलगा सागर गणपत मडावी प्रयत्न करत होता.
दरम्यान, २०२२ मध्ये पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सागरची ओळख ज्ञानेश्वर शिवाजी वरे (रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे) याच्याशी झाली. वरे याने मंत्रालयात ओळखी असल्याचे सांगत अनुकंपा तत्वावर उपजिल्हाधिकारी (वर्ग-१) पद मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
या बहाण्याने वरे व त्याच्या चार साथीदारांनी सागर व त्याची आई मीना मडावी यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार आणि एटीएमद्वारे एकूण २,१६,७९,१०० रुपये उकळले.
या प्रकरणी सागर मडावी यांनी २० एप्रिल २०२६ रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला आणि राजगड (जि. पुणे) येथून त्याला अटक केली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील इतर चार फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. तसेच सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक समाधान दौड व पोलीस निरीक्षक विजय मुसनवार यांच्या पथकाने केली.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button
Jaxx Wallet Download
Jaxx Liberty Wallet
Jaxx Wallet
gem visa login
gem visa login australia