आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजीक

गडचिरोलीत अंत्यसंस्कारासाठी चिता लाकूड मोफत; नागरिकांना मोठा दिलासा

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत नगरपालिकेने अंत्यसंस्कारासाठी लागणारे चिता लाकूड आता पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.

या निर्णयानुसार, कटानी नदी परिसरात अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकूड नागरिकांना विनामूल्य दिले जाणार आहे. यामुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी होण्यास मोठी मदत होणार असून, लाकूड मिळवण्यासाठी होणारी धावपळही थांबणार आहे.

हा निर्णय संवेदनशील व लोकहिताचा असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

या उपक्रमासाठी नगराध्यक्ष ॲड. प्रनोतीताई निंबोरकर, उपाध्यक्ष निखिलजी चरडे, गटनेते अनिलभाऊ कुणघाडकर तसेच सर्व सभापती व नगरसेवकांचे कौतुक करण्यात येत आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker