आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

भाजप आदिवासी मोर्चा गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती

गडचिरोली, प्रतिनिधी :

भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

ही नियुक्ती भाजपा आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या अनुमतीने आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांनी निवड जाहीर केली.

यावेळी गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते प्रा. सुरपाम यांना पक्षाचा दुपट्टा घालून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महामंत्री विनय मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. नितीन कोडवते तसेच डॉ. चंदा कोडवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते, माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार कृष्णा गजबे, डॉ. नामदेव उसेंडी, महामंत्री प्रकाश गेडाम व विनय मडावी यांना दिले. तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker