आपला जिल्हाताज्या घडामोडी
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार सुधाकर अडबले यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
आमदार सुधाकर अडबले यांनी जिल्हा दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.
बैठकीत जिल्ह्यातील काही गावांमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना वर्गवाढीची परवानगी देण्याच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः ज्या ठिकाणी आधीपासून खासगी अनुदानित शाळा कार्यरत आहेत, त्या परिसरात नव्याने जिल्हा परिषद शाळांना वर्गवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार अडबले यांनी केली.



