गडचिरोली,प्रतिनिधी :-
स्थानिक आदिवासी परधान समाज मंदिर येथे दिनांक ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ समाज बांधव व वार्डातील नागरिकांच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी धरती आबा भगवान बिरसा मुंडा, शहीद वीर बाबुराव शेडमाके आणि समाजाचे प्रेरणास्थान तथा गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार स्व. बाबूरावजी मडावी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजातील स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारकांच्या अमूल्य त्यागाचे स्मरण केले. तसेच त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर सखोल प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास वार्डातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात उद्धव कुळमेथे, राजेश मडावी, सुरज शेडमाके, महेंद्र मसराम, अमोल मेश्राम, अजय सुरपाम, रुपेश सलामे, विजय सुरपाम, नंदकिशोर कुंभारे, आकाश कुळमेथे, अनिकेत बांबोळे, अंकित कुळमेथे, राज डोंगरे, प्रफुल विरगणमवार, गणेश मेश्राम, राकेश कुळमेथे, महादेव कांबळे, दत्ता करंगामी, मोहित सूर्यवंशी, नेहाल मेश्राम, सुधीर मसराम, वैभव रामटेके, साहिल शेडमाके, साहिल गोवर्धन तसेच महिला सदस्य श्रीधा सुरपाम, शालू सुरपाम, गंगा सलामे, सुनीता मसराम, सोनल सुरपाम, पौर्णिमा कुळमेथे यांच्यासह समाज बांधव व वार्डातील नागरिक उपस्थित होते.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन
Back to top button