आपला जिल्हाताज्या घडामोडी
१२९ जणांनी काढले एसटी प्रवास सवलतीचे NCMC कार्ड
ज्येष्ठ नागरिकांचा समाजभान जपणारा उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
“समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. ज्येष्ठ नागरिकही समाजोपयोगी उपक्रमांद्वारे हे ऋण फेडण्यासाठी तत्पर आहेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संस्था, तालुका व जिल्हा गडचिरोलीचे सचिव प्रभाकर कुबडे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संस्था, तालुका व जिल्हा गडचिरोलीच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कात्रटवार सभागृह, गडचिरोली येथे एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण १२९ ज्येष्ठ नागरिक व महिलांनी शिबिराचा लाभ घेत एसटी प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेले NCMC कार्ड काढून घेतले.
ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष एच. ए. पठाण, सचिव प्रभाकर कुबडे, उपाध्यक्ष उमेश आखाडे, कोषाध्यक्ष जयदेव चिचघरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जिल्हा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव सुधाकर बावणे, दिलीप आखाडे, पुरुषोत्तम म्हस्के, दादाजी चौधरी आणि शरद पाटील ब्राह्मणवाडे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



