निवडणूक
गडचिरोली नगराध्यक्षा पदासाठी १३ उमेदवारांचे नामांकन दाखल

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत नगराध्यक्षा पदासाठी आज दुपारी ३.०० वाजेपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी आपापली नामांकनपत्रे दाखल केली. प्रशासनाकडून प्राप्त माहितीप्रमाणे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणात जोरदार उपस्थिती दर्शवली आहे.
प्राप्त यादीप्रमाणे नामांकन दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे :-
१. कविता सुरेश पोरेड्डीवार (अपक्ष)
२. अभिलाषा नेताम (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)
३. रेना सतीश चिपटे (भारतीय जनता पार्टी)
४.विनिता नवनाथ बांबळे (गडचिरोली परिवर्तन मंच अपक्ष)
५. कविता सुरेश पोरेड्डीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
६. शालिनी दिलीप भोयर (अपक्ष)
७. विभाषा नागनाच भुसारी (नॅशनलिस्ट काँग्रेस पक्ष — शरदचंद्र पवार गट)
८. योगिता प्रमोद पिपरे (अपक्ष)
९. गीता सुशील हिंगे (भारतीय जनता पार्टी)
१०. अभिलाषा नेताम (अपक्ष)
११. प्रणोती सागर निंभोरेकर (भारतीय जनता पार्टी)
१२. प्रणोती सागर निंभोरेकर (भारतीय जनता पार्टी — दुसरे फॉर्म)
१३. किरण विवेक बुरसे (अपक्ष)



