
गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली 14 पैकी 14 उमेदवारांचे अर्ज वैध. १४ उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले होते पैकी १९ अर्ज वैध तर 3 अर्ज अवैध ठरले आहेत. यात डॉ. देवराव होळी यांचे 2 व श्री विश्वजीत कोवासे यांचा 1 अर्ज अवैध ठरला.
डॉ. देवराव होळी आणि विश्वजीत कोवासे यांनी पक्षाचा एबी फार्म न जोडल्यामुळे त्यांचे अर्ज अर्ज अवैध ठरले आहे. परंतु त्यांचे अपक्ष अर्ज वैध आहेत. हे दोघेही निवडणूक लढवणार असून या विधासभेत चौरंगी लढतीची शक्यता आहे




