क्राईममहाराष्ट्र

कत्तलीसाठी परराज्यात जनावरे नेणाऱ्या आरोपीना अटक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

अवैध व्यवसाय करणा-या व्यक्तींवर आष्टी पोलीस स्टेशनच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली.  ०४ आयसर व ०१ पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे भरुन तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवून जाणारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जनावरे भरुन तेलंगाना राज्यात कत्तली करीता जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन  गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कौनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करुन ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवुन पळून जाण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना ४ ते ५ कि. मी. पाठलाग करुन पकडण्यात आले आहे. 

सदर कारवाईत एकुण ५८,००,०००/- (अक्षरी अठ्ठावन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण १०४ गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत १) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन शेख ३) शेख आरीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखर गाधाम या आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील ईतर ३ असे एकूण ८ आरोपीतांवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा क्र. १८७/२०२३ कलम ४२९, ३४ भादवी, सहकलम ५ (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५५ (सुधारणा) तसेच सहकलम ३ ११ (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० तसेच सहकलम ११९ महा. पोलिस अधिनियम १९५१ तसेच सहकलम ३३०/१७७ मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोउपनि अजय राठोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी  यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी  सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  कुंदन गावडे, पोउपनि अजय राठोड, गणेश जंगले, श्रेणी पोउपनि येनगंटीवार, सफी / देवतळे, पोहवा / ४०७ मडावी, पोना / ३३१९ जाधव, पोना/ ५१७७ सुरवाडे, पोशी / ३३९५ नागुलवार, पोशी / ५६६१ रायसिडाम, पोशी / ४१५४ पोतराजे, पोशी/ ५६७५ गेंदाळे यांनी पार पाडली आहे

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker