महाराष्ट्र

नातेवाईकांचा जातीचा दावा अवैध ठरला तरी अर्जदाराला वैधता प्रमाणपत्र द्या -उच्च न्यायालय

औरंगाबाद,प्रतिनिधी :-  

नातेवाईकांचा जातीचा दावा अवैध ठरला असला तरी अर्जदाराला वैधता प्रमाणपत्र देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठने  आदेश दिले आहे.

 जर अर्जदाराचे वडील, काका आणि इतर 3 भावडांचा अनुसूचित जमाती प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरला असला तरी अर्जदाराला संविधानिक  अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नसल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला. अर्जदार दिशा दिनेश ठाकूर (WP. No. 15304/ 2023) यांना तात्काळ ठाकूर जमातीचे वैधता प्रमाणपत्र  देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपिठाचे न्या. मंगेश एस. पाटील आणि न्या. शैलेष पी. ब्रम्हे यांनी दिला.

 या ऐतिहासिक निर्णयाबद्दल याचिकाकर्त्यांच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ ॲड. सुशांत येरमवार यांनी भक्कमपणे बाजू याचिकेद्वारे मांडली होती. यामुळे न्यायालयाने हा आदेश पारित केला.या न्याय निर्णयामुळे अनुसूचित जमाती मध्ये अनेकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker