राजकीय
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

गडचिरोली,प्रतिनिधी :-
महापुरुषांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळा कॉलेज उभे केले असताना भीक म्हणून व एका अर्थाने महापुरुषांना भिकारी. म्हणन्याचा काम भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हा महामानवांचा अपमान असून त्याचा निषेध म्हणून अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने गडचिरोली येथे इंदिरा गांधीजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.,
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करत या महापुरुषांनी भीक मागून शाळा बनवल्याचे वक्तव्य केले.



